कांदा निर्यातबंदीबाबत मंगळवारी निर्णय

September 18, 2011 11:46 AM0 commentsViews: 5

18 सप्टेंबर

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. दहा दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. दरम्यान काल अर्थमंत्री प्रणव मुखर्जी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये एक बैठक पार पडली. याबैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही मात्र 20 तारखेला मंत्रिगटाच्या बैठकीतच निर्यातबंदी उठवण्याबाबत निर्णय होईल असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा तिढा अजून दोन दिवस तरी कायम राहणार आहे. आता या बैठकीकडे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत. पण तोपर्यंत कांद्याचे लिलाव बंदच राहणार आहेत.

close