मोदींच्या विरोधात निदर्शन करणारे दंगल पीडित ताब्यात

September 18, 2011 4:54 PM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पण या उपोषणाविरोधात निदर्शनं करण्याची तयारी करणार्‍या दंगल पीडित आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मल्लिका साराभाई आणि मुकुल सिन्हा या सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. हे कार्यकर्तेही मोदींना जाहीर पत्र लिहणार आहेत. मोदींना गुजरात दंगल पीडितांबद्दल सहानुभुती व्यक्त करायला 9 वर्ष का लागली असा सवाल ते मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. पण निदर्शनं सुरू होण्याआधीच पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते आणि निदर्शनांमध्ये सहभागी व्हायला आलेल्या दंगल पीडितांना ताब्यात घेतलं.

close