बीसीसीआयची नवी टीम निश्चित

September 18, 2011 5:09 PM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या पदाधिकार्‍यांची नावं जवळपास निश्चित झाली आहे. बीसीसीआयची 82 वी वार्षिक बैठक सोमवार आणि मंगळवारी मुंबईत होत असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाल संपत असून बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून एन श्रीनिवासन पदभार स्विकारतील. सचिवपदी संजय जगदाळे यांची निवड निश्चित आहे. सचिव पदाच्या शर्यतीत ओरिसा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रणजीब बिस्वाल यांचं नावंही आघाडीवर होतं. सह-सचिवपदी हिमाचल प्रदेशच्या डॅशिंग अनुराग ठाकूर यांचं नाव निश्चित आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांची खजिनदारपदी नियुक्ती होईल. या महत्वाच्या पदांशिवाय पाच विभागांच्या उपाध्यक्षपदाची नावंही निश्चित झालीत. उत्तर विभागाच्या उपाध्यक्षपदी अरुण जेटली असतील. तर दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षपदी शिवलाल यादव यांचं नाव निश्चित झालंय. चित्रक मित्रा पूर्व विभागाचे उपाध्यक्ष असतील. पश्चिम विभागातर्फे निरंजन शहा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. मध्यविभागाचे उपाध्यक्ष म्हणून सुधीर डबीर यांचं नाव निश्चित आहे.

नव्या पदाधिकार्‍यांची टीम

अध्यक्ष – एन.श्रीनिवासनसचिव – संजय जगदाळेसह-सचिव – अनुराग ठाकूरखजिनदार – अजय शिर्केउपाध्यक्ष, उत्तर विभाग – अरुण जेटलीउपाध्यक्ष, दक्षिण विभाग – शिवलाल यादवउपाध्यक्ष, पूर्व विभाग – चित्रक मित्राउपाध्यक्ष, पश्चिम विभाग – निरंजन शहाउपाध्यक्ष, मध्य विभाग – सुधीर डबीर

close