डमरु फेस्टिव्हलमध्ये वाद्यांची खास मेजवानी ; आज समारोप

September 18, 2011 1:30 PM0 commentsViews: 16

18 सप्टेंबर

पुण्यात सध्या सुरू असलेल्या डमरु फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच फेस्टिव्हल आहे. तबलावादक पंडित विजय घाटे आणि पखवाजबादक पंडित भवानी शंकर यांच्या जुगलबंदीने तिसर्‍या दिवसाची सुरूवात झाली. त्यानंतर रंगला जीनो बँकचा ड्रम परफॉर्मन्स. तर दक्षिण भारतातल्या घटम या वाद्यात निष्णात असणार्‍या विद्वान विक्कू विनायक राम, त्यांचा मुलगा व्ही.सेल्वा गणेश आणि नातू महेश विनायक राम यांच्या परफॉर्मन्सनं कार्यक्रमात रंगत आणली. तसेच संध्याकाळीही ताल वाद्यांच्या जुगलबंदीची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. या फेस्टिव्हलची सांगता पंडित शिवमणी यांच्या ड्रम वाद्याने होणार आहे.

close