मारूती नवलेंना लवकरच अटक होणार

September 19, 2011 9:11 AM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी अखेर मारूती नवलेंना अटक होणार आहे. अटक टाळण्यासाठी नवलेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. पणहायकोर्टाने नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला. आयबीएन लोकमतने या बातमीचा सतत पाठपुरावा केला होता. यामुळे अखेर पोलिसांनी यांची दखल घेत नवलेंवर गुन्हा दाखल करावा लागला होता. आज कोर्टात नवलेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यावेळी मारुती नवले कोर्टात उपस्थित नव्हते.त्यामुळे पोलीस नवलेला अटक करणार की मारुती नवले स्वत: पोलिसांना शरण जाणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट इथं पवन गांधी ट्रस्टची जमीन बळकावल्याप्रकरणी 18 मे रोजी ट्रस्टने तक्रार दाखल करण्यात आली होती. तब्बल 2 महिने उलटल्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात नवले यांच्या विरोधात कलम 465, 468,471,420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

close