मोदींचा मुस्लीम टोपी घालायला नकार !

September 19, 2011 10:43 AM0 commentsViews: 7

19 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी काल मुस्लीम टोपी घालायला नकार दिला. मोदींना अभिवादन करताना मौलवी सय्यद इमाम यांनी त्यांना मुस्लिम टोपी दिली. पण त्यांनी ती घालायला नकार दिला. पण मुस्लिम टोपी जरी घातली नसली तरी त्यांनी मौलवींनी दिलेली शाल स्वीकारली. नरेंद्र मोदी आणि त्या मौलवींमध्ये काय नेमकं संभाषण झालं हे मात्र समजलं नाही. मोदींचे हे सद्भावना मिशन असताना त्यांनी मुस्लिम टोपी घालण्यास नकार दिल्यामुळे यावरुन आता चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

close