युतीच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला – अजित पवार

September 19, 2011 1:28 PM0 commentsViews: 3

19 सप्टेंबरयुतीच्या काळात महाराष्ट्र मागं गेला. सेना-भाजप सत्तेत असलेल्या सर्व पालिका आणि पंचायत संस्थांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे अशी कडक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज आणि उध्दव ठाकरे हे भाऊ सत्तेसाठी भांडत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. परभणीत झालेल्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.तसेच गृहमंत्री आर.आर. पाटील रविवारी लंडनच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कसे लावले जातात याची ते पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबदमध्ये बोलताना आबांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या, आबांना सुटाबुटात कसे दिसतात हे मला पाह्याचं आहे अशा शब्दात अजितदादांनी आबांना शुभेच्छा दिल्या.

close