बस खड्‌ड्यात कोसळून 1 ठार

September 19, 2011 7:32 AM0 commentsViews: 5

19 सप्टेंबरसातार्‍याहून बोरीवलीला जाणारी एक खाजगी व्हाल्वो बस पनवेलजवळ खड्‌ड्यात कोसळली. पनवेलच्या चिखलेगावजवळ ही बस खड्‌ड्यात कोसळली. या अपघातात 28 जणं जखमी झाले आहेत. त्यात बस ड्रायव्हरचाही समावेश आहे. अपघातात निर्मला इथारे या महिलेचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर आहेत. जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमी बोरीवलीचे आहेत.

close