मुंबई पालिकेचे कर्मचारी संपावर

September 19, 2011 1:58 PM0 commentsViews: 3

19 सप्टेंबरअखेरमुंबई महापालिकेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यातल्या 7 पैकी 6 संघटनांनी संप मागे घेतला. 2009 पासून 6 वा वेतन आयोग लागू होणार असल्याच्या अटीवर संघटना राजी झाल्या आहेत. त्यामुळे शरद राव यांच्या संघटनेनं संप पुकारला असला तरी त्याचा फार मोठा फटका बसणार नाही, असा दावा बीएमसी आयुक्त सुबोधकुमार यांनी केला. महापालिका कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग आधीच लागू करण्यात आला आहे. त्यात सुधारणा करावी, अशी कामगार नेते शरद राव यांची मागणी होती. पण जुन्याच करारानुसार वेतनवाढ मिळेल हे आयुक्त सुबोधकुमार यांनी स्पष्ट केलंय. जे कर्मचारी किंवा संघटना हा करार मानणार नाहीत त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करू गैरहजर राहतील त्यांचे पगार कापण्यात येतील असं कडक इशारा सुबोध कुमार यांनी दिला.

close