कांद्यावरील निर्यातबंदी उठण्याची शक्यता

September 20, 2011 8:59 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

कांदा निर्यातप्रश्नी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे राज्यासह देशभरात असंतोष निर्माण झाला होता. सगळ्याच प्रमुख बाजारसमित्यांमधील लिलाव शेतकरी आणि व्यापार्‍यांनी बंद केले आहेत. त्यामुळे लाखो टन कांदा सडून गेला आहेत. यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. पण निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले आणि धड उत्पादनखर्चही भरून निघत नसल्याने कांदा उत्पादक वैतागला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.

close