मुंडेंचे जावई मधुसुदन केंद्रे अखेर राष्ट्रवादीत

September 19, 2011 4:13 PM0 commentsViews: 7

19 सप्टेंबरभाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांचे जावई आणि गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष मधुसुदन केंद्रे यांनी आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपला भवितव्य नसल्यामुळेचं आपण पक्ष सोडतोय असं मुंडेंचे जावई मधुसुदन केंद्रे यांनी स्पष्ट केलं.मधुसुदन केंद्रे राष्ट्रवादीत प्रवेश करणार यांची बातमी कळताच मुंडेंगटात अस्वस्था निर्माण झाली. मुंडे यांनी अगोदर केंद्रे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्रे आपल्या निर्णयावर ठाम राहीले. यानंतर मुंडेंनी थेट अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. दुसर्‍यांच्या घरात फोडी करू नये असा सल्लामुंडे यांनी अजितदादांना दिला. अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं आहे त्यांनी राज्याचा विकास करावा स्थानीक पातळीवरून राजकारण करू नये असा सल्लाही मुंडेंनी दिला. मुं़डेंच्या या सल्ल्यांला अजितदादांनी आपल्या शैलीत मुंडेंवर हल्ला केला. आपण आपली घरं नीट सांभाळावी असा टोला अजितदादांनी लगावला. मात्र मुंडे-अजितदादांच्या शाब्दिक हल्ल्यात मधुसुदन केंद्रे यांनी राष्ट्रवादीत खुद्द अजित पवारांच्या उपस्थित प्रवेश केला.

close