शरद राव मुंबईला वेठीस धरत आहेत – नारायण राणे

September 20, 2011 9:09 AM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेचे कामगार नेते शरद राव मुंबईला वेठीस धरताहेत अशाप्रकारे संप करणे चुकीचं आहे असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलंय. तसेच सरकारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढावा आणि संप मागे घ्यावा असंही राणेंनी शरद राव यांना आवाहन केलं.

नव्या वेतनश्रेणीच्या मुदद्यावरुन कामगार नेते शरद राव यांची संघटना संपावर गेली. त्याचा मुंबईतल्या पाणी विभाग, अग्निशमन दल, सफाई विभाग आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम जाणवायला लागला आहे. शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सकाळपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. आता या चर्चेची तिसरी फेरी साडेतीन वाजता होणार आहे. त्यानंतरचं संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

close