टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं होणार पोस्टमॉर्टम

September 19, 2011 4:18 PM0 commentsViews: 8

19 सप्टेंबरभारतीय क्रिकेट बोर्डाची वार्षिक बैठक आज मुंबईत पार पडली. आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातला सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे भारतीय टीमच्या इंग्लंडमधील खराब कामगिरीचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. भारतीय टीमचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे आणि मोहिंदर अमरनाथ हे या कमिटीत असतील. इंग्लंड दौर्‍यात भारतीय टीमला टेस्ट सीरिज, टी-20 आणि वन डे सीरिजमध्येही दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय टीमची टेस्टबरोबरच वन डे क्रमवारीतही घसरण झाली. या पराभवाचा पंचनामा ही कमिटी करणार असून, येणार्‍या काळात भारतीय टीमला संजीवनी देण्यासाठी कोणते प्रयत्न केले जावेत हेही ठरवण्यात येणार आहे.

close