पृथ्वी फेस्टिव्हलची सांगता

November 17, 2008 7:50 AM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभ गेले दहा दिवस सुरू असलेल्या पृथ्वी फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस ' शांतता कोर्ट चालू आहे ' आणि ' सी फॉर क्लॉऊन ' नं. गाजवला. हा फेस्टीवल ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांना समर्पित करण्यात आला होताय. पृथ्वी फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात झाली ती एका वेगळ्या सिनेमानं. हा सिनेमा होता ' शांतता कोर्ट चालु आहे '. विजय तेंडुलकरांच्या ' शांतता कोर्ट चालूआहे ' या नाटकावरच बेतलेला हा सिनेमा. ' विजय तेंडुलकर यांची ही स्क्रिप्ट आहे. केवळ नाटकाचं रूपातंर मी चित्रपटात केलं आहे ' असं दिग्दर्शक सत्यदेव दुबे सांगत होते. ' शांतता कोर्ट चालुआहे ' या सिनेमात एक नाटक घडतं. यातही मूळ नाटकाप्रमाणेच बेणारे नावाची एक शिक्षिका आणि तिच्यावर भरलेला खटला आहे. या सगळ्या परिस्थितीला बेणारे बाई कशी सामोरी जाते आणि समाजाविरोधात कशी बंड करते, हे या सिनेमाचं सूत्र. ही गाजलेली भूमिका सुलभा देशपांडे यांनी जिंवत केली आणि त्यांना ही ओळख मिळवून दिली दुबेंजीनीच. या सिनेमानंतर… सिनेमोटोग्राफरचं ' सी फॉर क्लॉऊन ' आणि अक्वायरसचं 'ऑल अबाऊट वुमन ' ही नाटकंही मेजवानीला होतीच. आता उत्सुकता नव्या नाट्यप्रयोगांची. नव्या कल्पनांची आणि पृथ्वीच्या नव्या उपक्रमांची.

close