मिशन सद्भावनाची सांगता

September 19, 2011 4:40 PM0 commentsViews: 6

19 सप्टेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपला 3 दिवसांचा उपवास सोडला. भाजप आणि मित्र पक्षांचे अनेक नेते तसेच सर्व धर्मांचे गुरू यावेळीउपस्थित होते. शांती आणि एकतेसाठी मोदींनी सुरू केलेल्या सद्भावना मिशनमुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचं स्थान थोडं बळकट झालं. असं जाणकार मानतात. पण या 72 तासांच्या उपवासानंतर त्यांची जहाल हिंदुत्ववादी प्रतिमा मवाळ आणि सेक्युलर झालीये का हा खरा प्रश्न आहे. तर उपवास सोडल्यानंतर नरेंद्र मोदींनी स्वतः धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा केला. मी अल्पसंख्यांक समाजाच्या मतांचं राजकारण करत नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला हाणला. तसेच अण्णा हजारेंचा उल्लेख करत मोदींनी स्वतःच्या आंदोलनाची तुलना त्यांच्या उपोषणाशी करण्याचाही प्रयत्नही केला.मोदींनी तीन दिवसांचा उपवास सोडला. तेव्हा ठरल्याप्रमाणे सर्व धर्मांचे गुरू त्यांना लिंबूपाणी द्यायला मंचावर उपस्थित होते. तसेच भाजप आणि मित्रपक्षांचे ज्येष्ठ नेतेही आपला पाठिंबा जाहीर करायला जमले होते. मोदींची सेक्युलर आणि राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी हा सद्भावना मिशनचा घाट घातला असला तरी मोदी मात्र ते मान्य करायला तयार नाही.राजकीय नाही.. राष्ट्रीय मिशन असा मोदींनी जाहीर उच्चार केला नसला. तरी त्यांची पंतप्रधानपदाची इच्छा इतरांनी बोलून दाखवली. वेंकय्या नायडूंसोबत अनेक भाजप नेत्यांनी मंचावरून म्हटलं की मोदी पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल. यावरून सध्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पण या स्पर्धेत सहभागी असलेल्या अडवाणी, जेटली आणि सुषमा या तिघांनाही अहमदाबादेत येऊन मोदींचं गुणगान करावं लागलं.मोदींना भाजप, संघ, सेना, मनसे, अकाली दल आणि अण्णा द्रमुकचा पाठिंबा असला. तरी नितीश कुमारांचा जेडीयू हा सर्वांत मोठा मित्रपक्ष मात्र चार हात दूर राहिला. तसेच मोदी उपोषण करत होते. त्या ठिकाणाच्या बाहेर तीस्ता सेटलवाड आणि दंगलग्रस्तांनी मोदींचा निषेध करत कुराणाचं पठण केलं. या तीन दिवसांच्या उपवासात मोदींनी गुजरात दंगलींबद्दल खेद व्यक्त केला असला. तरी क्षमा मात्र मागितली नाही.

close