लातूर,उस्मानाबादमध्ये भूकंपाचा धक्का

September 19, 2011 4:54 PM0 commentsViews: 73

19 सप्टेंबरमहाराष्ट्रात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूंकपाची तिव्रता 3.9 एवढी होती. लातूरपासून 56 किलोमीटर आणि किल्लारीपासून 14 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचं केंद्र होतं. गेल्या वर्षभरात दोन्ही जिल्ह्यांना भूकंपाचे एकूण 11 धक्के बसलेत. त्यापैकी या धक्क्यांची तीव्रता 1 ते 3 रिश्टर स्केल या दरम्यान होती. त्यातुलनेत आज सकाळी आलेला भूकंप थोड्या जास्त तीव्रतेचा होता. त्यामुळेरहिवाशांंमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं.

close