रिक्षाचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

September 20, 2011 10:58 AM0 commentsViews: 8

20 सप्टेंबर

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या संपापाठोपाठ पश्चिम उपनगरात अंधेरी, वांद्रे आणि सांताक्रुझ परिसरात रिक्षा चालकांनी कालपासून आंदोलन पुकारले आहे. कालपासून या भागात रिक्षा नसल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. आजही तुरळक प्रमाणात रिक्षा रस्त्यावर धावत आहेत.

सोमवार सकाळपासून मुंबई पश्चिम उपनगरात रिक्षांचा संप होता. त्यामुळे बस आणि लोकल मधील गर्दी तर प्रचंड वाढली होती. बोरिवलीत सकाळी काही प्रमाणात रिक्षांची वर्दळ होती. पण दुपारनंतर रिक्षा बंद झाल्या होत्या. अंधेरी, पार्ले आणि बांद्र्यात रिक्षा बंद होत्या. काही बस आगारांमधून गर्दीच्या मार्गांवर जादा बसेस चालवण्यात आल्या. या संपाचा जास्त फटका बांद्रा ते दहिसर भागातल्या रहिवाशांना बसतोय. आरटीओने रिक्षाचालकांवर मीटर फास्ट ठेवल्याबद्दल कडक कारवाई केल्याने रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. हा संप बेमुदत असल्याने मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहील असं रिक्षाचालकांकडून सांगण्यात आलंय. तसेच या संपात कोणतीही असोसिएशन सहभागी नाही.

close