सोन्यानं नटली ‘नॅनो’

September 19, 2011 5:13 PM0 commentsViews: 41

19 सप्टेंबरटाटांची नॅनो ही जगातली सर्वात स्वस्त गाडी आहे. पण हीच नॅनो आता जगातली सर्वात महागडी गाडी होणार आहे. आज टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी सोन्या-चांदीच्या नॅनोचं अनावरण केलं. या नॅनोची किंमत जवळपास 23 कोटींच्या घरात आहे. या नॅनोला बनवताना त्यात 80 किलो सोनं आणि 15 किलो चांदीचा वापर केला गेला आहे. पण या नॅनोला कोणालाही चालवता येणार नाही. कारण टाटा ग्रुपनं भारतीय ज्वेलरी आर्टला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही सोन्याची नॅनो तयार केली. पाच डिझायनर्सनी मिळून 8 महिन्यात ही गाडी बनवली.

close