नाशिकमध्ये प्राध्यापकाला गुंडांची मारहाण

September 20, 2011 8:07 AM0 commentsViews: 4

20 सप्टेंबर

नाशिकमधील गुंडांची गुंडगिरी सुरुच आहे. सावरकर नगरमधील प्राध्यापक रणधीरसिंह क्षत्रीय यांना काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यांचा क्लास सुटल्यावर क्लासमधील मुलीची काही मुलं छेड काढत होती. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रा.क्षत्रीय गेले असता या मुलांनी त्यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला विद्यार्थी अभिजित पाटील हा सुद्धा या मारहाणीत जखमी झाला आहे. प्रा. क्षत्रीय यांना मारहाण होत असताना लोकांनी बघ्यांची भूमिका घेतली याबद्दल क्षत्रीय यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला.

close