ऊस कामागारांच्या वेतनासाठी मनसे आक्रमक

September 20, 2011 8:13 AM0 commentsViews: 6

20 सप्टेंबर

पुण्यात ऊसाला जास्त भाव मिळावा म्हणून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. तर दुसरीकडे जळगांवला ऊस तोडणी कामागारांचं थकीत वेतन मिळावे म्हणून मनसे आक्रमक झाली आहेत. वर्षापूर्वी जिल्ह्याचं वैभव असलेले 4 साखर कारखाने बंद झाले आणि सहकार चळवळीला पार ग्रहण लागलं. आपल्या थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी अनेक आंदोलनं कामागारांनी केली. पण आश्वासनांशिवाय कामगारांच्या पदरात काहीही पडलं नाही.आता हा मुद्दा घेऊन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने जिल्हा बँकेवर काढलेल्या या मोर्च्यात कामगारांसह शेतकरी आणि ठेवीदारांचाही लक्षणीय सहभाग होता.

close