कर्मचार्‍यांच्या संपामुळे मुंबईकर वेठीस

September 20, 2011 8:31 AM0 commentsViews: 4

20 सप्टेंबरमुंबई महापालिकेतील 70 टक्के कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या नागरी सेवांवर परिणाम झाला आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा तसाच आहे. तर महापालिकेच्या हॉस्पिटलमधील काही नर्सेस, वॉर्ड बॉय संपावर गेले. त्यामुळे मुंबईकरांना या संपाचा चांगलाच फटका बसला आहे. नव्या वेतनश्रेणीच्या मुदद्यावरुन कामगार नेते शरद राव यांची संघटना संपावर गेली.त्याचा मुंबईतल्या पाणी विभाग, अग्निशमन दल, सफाई विभाग आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम जाणवायला लागला आहे. शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सकाळपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. आता या चर्चेची तिसरी फेरी साडेतीन वाजता होणार आहे. त्यानंतरचं संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.कर्मचार्‍यांच्या या संपात महापालिकेच्या हॉस्पिटलचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. केईएम हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि नर्सेस संपावरगेल्या आहे. जवळपास 2500 कर्मचारी संपावर गेल्याने पेशंटना याचा फटका बसला. पालिकेनं काल रात्रीपासून संपाच्या दृष्टीनं तयारी केली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जवळपास 150 होमगार्ड, जे.जे. हॉस्पिटलमधल्या स्टाफ नर्सेसची मदत घेण्यात येत आहे अशी माहिती हॉस्पिटलचे डीन डॉ. संजय ओक यांनी दिली. सध्या हॉस्पिटलमधील ओपीडी सुरु आहे. मात्र स्वच्छता करणारे कर्मचारी मोठ्या संख्येनं संपावर गेले आहेत. होमगार्ड आणि राज्य वैद्यकीयकर्मचार्‍यांची मदत घेतली जात आहे.दरम्यान या संपात सफाई कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा तसाच पडून आहे. दादर फूल मार्केटमध्येही कचरा तसाचपडून आहे.

close