ईशान्य भारतात भूकंपाच्या बळींची संख्या 80 वर

September 20, 2011 11:23 AM0 commentsViews: 1

20 सप्टेंबर

ईशान्य भारतात भूकंपामधल्या बळींची संख्या 80 वर पोहचली आहे. यामध्ये सिक्कीममध्ये सर्वाधिक म्हणजे 53 बळी गेले आहेत. बिहारमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 9, नेपाळमध्ये 7 तर तिबेटमध्ये 7 जण बळी या भूकंपामुळे गेले आहेत. गंगटोकमध्ये एक लाखांहूनही जास्त घरांचं नुकसान झालं आहे. खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचणी येत आहे. 9 हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने इथं मदत पोहोचवली जात आहेत. तर उत्तर सिक्कीममधल्या चुंग थंग भागात अजूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. लष्कराची 10 वैद्यकीय पथकंही इथं कार्यरत आहेत. बागदोराहून दार्जिलिंगला जोडणारा नॅशलन हायवे 55 आता पूर्ववत होत आहे. तर गंगटोक नाथू ला हायवेही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. नॅशनल हायवे 31 वरून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर गंगटोकपासून 55 किमी अंतरावर असलेल्या गायखोलामध्ये दरड कोसळली आहे. यामुळे सिलीगुडी-गंगटोक हायवे ठप्प झाला आहे.

close