मुंबईत भरलं पहिलं संगीत संमेलन

November 16, 2008 4:31 PM0 commentsViews: 10

16 नोव्हेंबर, मुंबई कवी संमेलनं, नाट्यसंमेलनं होतात. साहित्य संमेलनं भरवली जातात. पण मुंबईत संगीतकारांचंच एक अनोखं संमेलन भरलं होतं. या संमेलनातली ही अनोखी मजा. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये या संगीतकार संमेलनाच्या निमित्तानं सुरांनी संध्याकाळ बहरून गेली होती.अनेक नव्या जुन्या संगीतकारांच्या रचना यावेळी सगळ्यांसाठी सादर करण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाला अरूण म्हात्रे यांचं तितकंच साजेसं निवेदन होतं. कमलेश भडकमकर आणि मिथिलेश पाटणकर या दोन तरुण संगीतकारांनी पहिल्यांदाच असं संगीतकारांचं संमेलन भरवण्याचा प्रयत्न केलाय.' संगीत संमलेन भरवण्याची ही भन्नाट कल्पना असल्याचं ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी सांगितलं. ' नवीन आणि जुन्या संगीकारांचं हे अनोख संमेलन आहे. संगीतकारांच्या नवीन चाली ऐकायला मिळतात. तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतं. चर्चा होते ', असं संगीतकार मिथिलेश पाटणकर यांनी संमेलनाविषयी सांगितलं. दोन दिवस हे संगीतकार संमेलन रंगणार आहे. दुसर्‍या दिवशी जेष्ठ संगीतकार आणि श्रोते यांच्यात मुक्त संवाद होईल. अशा या अनोख्या संमेलनाला सगळ्यांनीच भरभरुन प्रतिसाद दिला.

close