‘तिचा बाप, त्याचा बाप’ सिनेमा लवकरच रिलीज

September 20, 2011 5:11 PM0 commentsViews: 67

20 सप्टेंबर

'तिचा बाप…त्याचा बाप…' हा सिनेमा रिलीजसाठी आता सज्ज झाला आहे. सचिन पिळगावकर आणि अरूण नलावडे यांची अभिनयाची जुगलबंदी आपल्याला यात पाहता येणार आहे.

तिचा बाप आणि त्याचा बाप समोरासमोर आले आणि मग सुरू झाली ती अनोखी जुगलबंदी. यात त्याचा बापाची भूमिकेत आहे सचिन पिळगावकर तर तिचा बापाच्या भूमिकेत अरुण नलावडे आहेत. अभिनयातील ही दोघही बापमाणसं. आता या सिनेमासाठी दोघांनाही चांगलीच उत्सुक आहेत. यातला ती आणि तो साकारलाय दोन नव्या चेहर्‍यांनी. आणि या सिनेमाचं दिग्दर्शन अतुल काळे यांनी केलं. सिनेमात सचिनच्या आवाजातीलं गाणंही आहे. एकूणचं हा सिनेमा प्रेक्षकांसाठी फुल एन्टरटेन्मेंट पॅकेज ठरेल असं वाटतंय.

close