कांद्याला 1200 रुपये भाव मिळाल्याने शेतकर्‍यांचा जल्लोष

September 21, 2011 9:07 AM0 commentsViews: 64

21 सप्टेंबरकांदा निर्यातबंदी मागे घेतल्यावर आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले. 12 दिवसांनंतर आज शेतकरी त्यांचा कांदा घेऊन बाजरात आले. लासलगावमध्ये तर शेतकर्‍यांनी लिलाव सुरू होताच जल्लोष केला. लासलगावमध्ये कांद्याला 1200 रु. क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. नांदगाव बाजारसमितीत 2 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजारावर ताण येऊ नये म्हणून टप्प्याटप्पयाने साचलेला कांदा आणण्याचं काम बाजार समितीत्यांनी केलं. निर्यात बंदी उठवली मात्र किमान निर्यात मूल्य 445 डॉलर प्रतिटन असे सर्वाधिक ठेवल्यामुळे ही अप्रत्यक्ष निर्यातबंदी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताहेत त्यामुळे निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहे.

close