पंतप्रधानपद आपल्यासाठी महत्त्वाचं नाही – अडवाणी

September 21, 2011 5:52 PM0 commentsViews: 8

21 सप्टेंबर

देशव्यापी रथयात्रेची घोषणा केल्यानंतर लालकृष्ण अडवाणी आज नागपूरमध्ये दाखल सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. आणि त्यानंतर पंतप्रधान पद आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं स्पष्ट केलं. पक्षानं आपल्याला आजपर्यंत जे दिलं तेच खूप महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले आणि एकप्रकारे 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचेच संकेत एकप्रकारे दिले.

पुन्हा एकदा रथयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी लालकृष्णी अडवाणी संघाचा आशीर्वाद घेण्यासाठी नागपूरमधल्या संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन भ्रष्टाचाविरुद्ध घोषित केलेल्या आपल्या मोहिमेचा मार्ग अडवाणींनी मोकळा करून घेतला. अडवाणी आणि मोहन भागवत यांच्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. आणि त्यानंतर बाहेर येऊन अडवाणींनी आपल्यासाठी पक्षापेक्षा पंतप्रधानपद महत्त्वाचं नसल्याचं स्पष्ट केलं.

रथयात्रेची घोषणा करण्यापूर्वी अडवाणींनी पक्षातल्या नेत्यांशी आणि संघ परिवाराशी चर्चा केली नाही. त्यामुळे सरसंघचालक त्यांच्यावर नाराज झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यातच ही नाराजी संघाच्या एका नेत्याकडून अडवाणींपर्यंत पोचवण्यात आली होती. आगामी काळात काँग्रेस तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या तयारीत असताना 83 वर्षांच्या अडवाणींच्या आक्रमक भाजपमधल्या दुसर्‍या फळीतल्या नेतृत्वाला धक्का बसेल, अशी भीती संघाला वाटतेय.

संघाशी जवळीक असणारे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी 2014 च्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार घोषित केला जाणार नाही, हे स्पष्ट केलंय. दुसरीकडे, नरेंद्र मोदींची राष्ट्रीय राजकारणात येण्याची तयारी सुरू आहे. तर असलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली वाजपेयींचे वारसदार बनण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे भाजपचं नेतृत्व जनरेशन नेक्स्टकडे जाणार याची चिन्हं दिसत आहे.

मोहम्मद अली जिना प्रकरणावरून संघाने काही वर्षांपूर्वीच अडवाणींना बाजूला सारलंय. आताही भाजपमधल्या घडामोडीत बारकारईनं लक्ष असल्याचं दाखवून देत संघानं आपला प्रभाव कायम ठेवला.

close