‘गरिबी झाली महाग’ ;दिवसाला 32 रुपये खर्च करणारे गरीब नाही !

September 21, 2011 9:33 AM0 commentsViews: 23

21 सप्टेंबर

महागाईनं त्रस्त झालेल्या नागरिकांना नियोजन आयोगानं एक धक्का दिला. दारिद्र्यरेषेची नवीन व्याख्या नियोजन आयोगाने तयार केली. आणि यानुसार शहरात दिवसाला 32 रुपये खर्च करणारा माणूस गरीब म्हणता येणार नाही असं म्हटलं आहे. ग्रामीण भागासाठी हीच खर्चाची मर्यादा 26 रुपये ठेवण्यात आली. म्हणजेच शहरी भागात महिन्याला 965 रूपये आणि ग्रामीण भागात 781 रूपये खर्च करू शकणारे गरीब नाहीत असं नियोजन आयोगाला म्हणायचय आहे. अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र नियोजन आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केलं. त्यामुळेच सध्या दारिद्र्य रेषेखाली असलेल्या अनेकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेता येणार नाही. तेंडूलकर कमिटी रिपोर्टवरून या सूचना सुचवल्याचे आयोगाने म्हटलं आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बेंगलोरसारख्या शहरात राहणार्‍या एका कुटुंबातल्या 4 सदस्यांचा महिन्याचा खर्च जर 3,860 पेक्षा जास्त असेल तर ते गरीब नाहीत. असंही नियोजन आयोगाने म्हटलं आहेत. पण साहजिकच यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपण पाहूयात नियोजन आयोगानं नेमकं काय म्हटलंय

खर्चाची मर्यादा

तांदूळ/गहू- 5 रू

सध्याची किंमत2 रु. तांदूळ, 12 रू.गहूभाज्या-1रू.80 पै5 ते 15 रू. किलो डाळ -1 रू. 50 रू. किलोदूध- 2रू.30 पैसे 27 रू. लीटर

close