जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे !

September 21, 2011 4:52 PM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी इंडियन पिपल्स ट्रिब्युनलच्या वतीनं नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीचा रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये समितीने जैतापूरमध्ये लोकशाहीची गळचेपी होतेय शिवाय या प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध आहे अशी निरीक्षणं नोंदवली आहेत. या त्रिसदस्यीय समितीत जे. सी. काला, एस. एम. परांजपे आणि डॉ. शांता रानडे यांचा समावेश होता.

close