मनिष तिवारींनी मागितली अण्णा हजारेंची लेखी माफी

September 21, 2011 12:28 PM0 commentsViews: 2

21 सप्टेंबर

काँग्रेसचे खासदार मनिष तिवारींनी अण्णा हजारेंची लेखी माफी मागितली आहे. तिवारींनी अण्णा हजारे भ्रष्टाचारात बुडाले आहे अशी टीका केली होती. यानंतर तिवारी यांनी जाहीर माफीही मागितली होती. अण्णा हजारे यांनी मनिष तिवारी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याप्रकरणातील नोटीसीली उत्तर देतांना, आपण अण्णा हजारेंची माफी मागत असून विनाकारण हे प्रकरण कोर्टात नेऊन न्यायालयाचा वेळ वाया न घालवता लेखी माफी मागत असल्याच सांगितल आहे. अण्णा हजारे यांचे वकील मिलींद पवार यांनी अण्णांनी मनिष तिवारी यांनी लेखी माफी मागीतल्यामुळे हे प्रकरण पुढे न वाढवण्याचे अण्णांनी सांगितले आहे.

close