नाशकात कांदा,द्राक्ष निर्यातीला ‘टेक ऑफ’

September 21, 2011 5:35 PM0 commentsViews:

21 सप्टेंबर

नाशिकमधून आता कांदा, द्राक्ष, डाळींब यांच्या निर्यातीचा हवाई मार्गही मोकळा झाला आहे. ओझर विमानतळावर हवाई कार्गोची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. एचएएल आणि हॅलकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सुरू होत आहे. ओझर विमानतळावरून 1964 पासून लष्करासाठी मालवाहतुकीची परवानगी होती. मात्र, पहिल्यांदाच आता इतर मालाच्या हवाई वाहतुकीची सोय नाशिककरांसाठी झाली आहे. 70 कोटी रुपयांची गुंतवणूक यात करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला नाशिकमध्ये पहिलं एअर कार्गो उतरणार आहे. नाशिकमधला माल परदेशात पाठवण्यासाठी आता मुंबई विमानतळावर ताटकळावं लागणार नाही.

close