हर्षदा वांजळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

September 22, 2011 6:06 PM0 commentsViews: 5

22 सप्टेंबर

मनसेचे दिवगंत आमदार रमेश वांजळेंच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हर्षदा वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. त्यांचे पती रमेश वांजळे यांच्या मृत्यूमुळे खडकवासला विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. या जागेवर हर्षदा वांजळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.अजित पवार यांच्या उपस्थितीत हर्षदा वांजळे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचं जाहीर करण्यात आलं. माझ्यावर कोेणाचाही दबाव नव्हता, असं यावेळेस हर्षदा वांजळेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईकही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत निलय नाईक यांनी बंडखोरी करत पुसद मतदारसंघातून मनोहर नाईक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

close