तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला सुरूवात

September 21, 2011 7:35 AM0 commentsViews: 71

21 सप्टेंबर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळजाभवानी देवीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. इतर नवरात्रोत्सवापेक्षा हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या उत्सवाची सुरुवात देवीच्या मंचकी निद्रेपासून होते. देवी आजपासून पुढचे 8 दिवस निद्रावस्थेत असते. घटस्थापनेला या तुळजाभवानीचं दर्शन भक्तांना घेता येतं.आणि दसर्‍यानंतर काही दिवस देवी पुन्हा काही काळ निद्रावस्थेत जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पूर्ण पीठ मानलं जातं. वरजा , तुरजा , तुकाई अशा अनेक नावांनी या तुळजाभवानीला ओळखलं जातं .स्त्रीत्वाला अभय देण्यासाठी आणि महिषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी तुळजाभवानी अवतरली असं मानलं जातं. नऊ दिवसांनंतर तिने महिषासुराचा वध केला अशीही कथा सांगितली जाते. या शारदीय महोत्सवाची सांगता 22 दिवसानंतर पौर्णिमेला होते.

close