राज ठाकरेंचे आरोप बिनबुडाचे – अजित पवार

September 22, 2011 12:40 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

राज ठाकरे यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनी पुराव्याशिवाय बोलू नये असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी राज ठाकरेंना दिलंय. काल बुधवारी राज यांनी आपण खडकवासला निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार नसल्याचं म्हटलंय. शिवाय पवारांचे खडकवासल्यात काय राजकारण चालतं यात मला रस नाही, ते तिथं लोकांवर दबावतंत्र लादून जमिनी हडप करतात असा आरोप राज ठाकरेंनी अजित पवारांवर केला होता.

दरम्यान खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादीचे तीन नेते भाजपच्या संपर्कात आहेत. हर्षदा वांजळेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं हे नेते नाराज झाले आहेत. या नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट भाजपाध्यक्ष नितीन गडकरींशी संपर्क साधला आहे. सर्वांशी चर्चा करून भाजपकडून कुणाला तिकीट द्यायचंय याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेत भाजपानं दिले आहेत.

close