राळेगणकर म्हणाले,’अण्णा आता सिक्युरिटी घ्याच’ !

September 22, 2011 1:01 PM0 commentsViews: 2

22 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घेण्यासाठी नकार दिला आहे. मात्र आता खुद्द घरच्याचं माणसांनी अण्णांच्या सुरक्षेसाठी ग्रामसभेत ठराव केला आहे. आणि घरच्या माणसांचा आग्रह आता अण्णा नकारू शकले नाही. त्याला अण्णा हजारे यांनी संमती दिली आहे. सुरक्षेबद्दलचा ठराव ग्रामसभेनं एकमतानं संमत केला. येत्या 2 ऑगस्टला ग्राम परिवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी ही ग्रामसभा घेण्यात आली. याचवेळेस आंदोलन बदनाम करण्यासाठी काहीजण कोट्यवधी रूपये खर्च करतायेत, त्यामुळे आमच्याविरुद्ध आता लेखही छापून येऊ शकतात असा आरोप अण्णांनी केला.

close