सहकारात भटक्या विमुक्तांना आरक्षण हवं – गोपिनाथ मुंडे

November 17, 2008 4:30 AM0 commentsViews: 73

16 नोव्हेंबर, मुंबईअमेय तिरोडकरसहकारात भटक्या विमुक्तांना आरक्षण द्यावं अशी मागणी भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांनी केली आहे. शिवाजीराव शेंडगे यांच्या शहात्तराव्या जयंतीच्या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमाला येतील असं म्हटलं जात होतं, पण ते आलेच नाहीत. गोपिनाथ मुंडे यांनी नेमका त्याचा फायदा घेतला. ' ते सगळे आले असते तर बरं वाटलं असतं पण ते आले नाहीत. त्यांच्यावर दबाव असणार. आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी ते आले नाहीत. ' या शब्दात गोपिनाथ मुंडे यांनी भुजबळांचा समाचार घेतला.मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसींचं आरक्षण कायम राहीलं पाहीजे ही भूमिकाही त्यांनी मांडली. त्याचवेळेला भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठीही ते बोलले. ' सामाजिक न्यायासाठी सहकारातही भटक्या विमकक्तांना स्थान मिळायलं हवं ' असं ते म्हणाले. भटक्या विमुक्तांबद्दलच्या रेणके आयोगाचा प्रश्नही रेंगाळलाय. त्याबद्दलचं आश्वासनही त्यांनी दिलं. राज्यात सहकारी संसथांवर मराठ्यांचं वर्चस्व असल्यामुळेच राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येते. नेमकं याच संस्थांत आरक्षण द्यावं ही मागणी करून मुंडे यांनी राजकीय चाल खेळली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयाला पर्याय म्हणून त्यांनी हे कार्ड पुढे आणल्याची चर्चा आहे.

close