सचिनच्या प्रस्तावाला द्रविडचा पाठिंबा

September 22, 2011 2:18 PM0 commentsViews: 4

22 सप्टेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवलेला वन डे क्रिकेटचा फार्म्युला आयसीसीनं फेटाळला असला तरी भारतीय टीममधल्या त्याच्या सहकार्‍यांनी मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. 50 ओव्हर्सच्या मॅचऐवजी 25 ओव्हर्सच्या 4 इनिंग खेळवण्याचा प्रस्ताव सचिनने आयसीसीसमोर ठेवला होता. पण आता या फार्म्युलावर विचार केला जाऊ शकतो असं मत द वाल राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे.

टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना वन डे क्रिकेटसमोर नवी आव्हानं उभी राहत आहे. यावर सचिनने नवीन फॉर्म्युला सूचवला होता. वन डे मॅचमध्ये 25-25 ओव्हरची लढत घेण्यात यावी. असा पर्याय सचिनने आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट यांना एक पत्र लिहून सूचवला आहे. आता 'द वॉल' सचिनच्या पाठीशी उभी आहे.

close