बेस्ट बस आगीत खाक ; जीवितहानी टळली

September 23, 2011 10:08 AM0 commentsViews: 10

23 सप्टेंबर

मुंबईत रस्त्यावर बेस्टच्या बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. कफ परेड भागात ही घटना घडली. डेपोमध्ये ही बस जात असल्याने पूर्णपणे रिकामी होती. पण अचानक धूर निघाल्यामुळे ड्रायव्हरने खाली उतरुन बघितले. आणि काही क्षणात बसने पेट घेतला. ही सीएनजी बस होती. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आमचे सिटीझन जर्नलिस्ट जुनेद आझम यांनी या बसचे फोटो आम्हाला पाठवले आहेत.

close