नुकसान भरपाईसाठी गावकर्‍यांचं पाण्यात बसून उपोषण

September 23, 2011 10:24 AM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या उत्रादा गावात नागरिकांनी एक अनोखं आंदोलन सुरू केलं. नदीच्या पाण्यात बसून या गावकर्‍यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. 2006 साली या गावात पुर आला होता. तेंव्हा अनेकांची घरं वाहून गेली होती, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं. पण त्या नुकसानाची अद्याप कुठलीही भरपाई मिळालेली नाही म्हणून गावकर्‍यांनी पाण्यात बसून उपोषण सुरू केलं आहेत. तहसिलदारांच्या आश्वासनानंतर आज त्यांनी आंंदोलनाला स्थगिती दिली. मात्र मागण्याचा निपटारा लवकरात लवकर न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला. गेल्या 5 वर्षापासून हा लढा सुरु आहे.

close