‘आदर्श’च्या सदस्यांची सुप्रीम कोर्टात धाव

September 23, 2011 10:30 AM0 commentsViews:

23 सप्टेंबर

आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नवीन बँक खातं उघडण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. सीबीआयने आदर्शची खाती गोठवली आहेत ती पुन्हा सुरु करण्याची सदस्यांनी मागणी केली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दुसरं खातं उघडण्यास मात्र सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. आदर्श सोसायटी दुसर्‍या बँकेत खातं उघडू शकते आणि तसं केल्यास संबंधित बँकेचे तपशील त्यांना पुढच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाकडे सादर करावे लागतील. यासंदर्भातली पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे.

close