इंदौर वन डे मध्ये भारताची डळमळीत सुरुवात

November 17, 2008 4:44 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर, इंदौरभारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी वन डे इंदौर इथं थोड्याच वेळापूर्वी सुरु झाली. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आहे. आणि मॅचच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये भारताला पहिला धक्का बसला. इन फॉर्म ओपनर विरेंद्र सेहवागला स्टुअर्ट ब्रॉडने क्लीन बोल्ड केलंय..पीचकडूनही फास्ट बोलर्सना सुरुवातीला चांगली मदत मिळतेय. त्यामुळे भारतीय बॅट्समननी सुरुवातही सावध केलीय. पहिली वन डे आपल्या बॅटने गाजवणारा युवराज सिंग या मॅचमध्ये खेळतोय ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू. नागपूरमध्ये त्याच्या सेंच्युरी इनिंग दरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत होता.

close