हाफकीन संस्थेला 2011 चं जागतिक मानांकन प्राप्त

September 22, 2011 5:03 PM0 commentsViews: 10

20 सप्टेंबर

जीवरक्षक औषधं निर्माण करणारी राज्यशासनाची हाफकीन संस्था सर्व परिचित आहे. या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय तो पिंपरी-चिंचवडच्या हाफकीनच्या शाखेने. पिंपरी-चिंचवड शाखेला 2011 चं जागतिक मानांकन प्राप्त झालं आहे. तब्बल 72 एकर परीसरात असलेली पिंपरीतील ही हाफकीनची संस्था आता खर्‍या अर्थाने नावा रुपाला येतेय. राज्यात हाफकीनची फक्त ही एकमेव शाखा आहे. जिथे सर्पदंशाबरोबरचं इतर चार गंभीर आजारांवर रामबाण उपचार करणारी औषधं निर्णाण केली जातात.

वषारी साप चावल्यामुळे दरवर्षी राज्यात सुमारे दोन हजार व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामध्ये अनेकावंर योग्य पद्दतीेने उपचार होत नसल्यामुळे ते दगावतात, पंरतू या प्रकल्पात तयार केलेली लस माणसाचा जीव वाचवते, विशेष म्हणजे अन्टी सीरम ही लस तयार करण्यासाठी सापाच विष काढुन या विषाचा प्रयोग घोड्यावर केल्या जातो आणि नंतर ही लस तयार होते.

close