साध्वी प्रज्ञासिंगचा तुरंगातच मुक्काम

September 23, 2011 10:38 AM0 commentsViews: 3

23 सप्टेंबर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंगला तुरंगातच रहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने प्रज्ञासिंगचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहेत. 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातली साध्वी प्रज्ञासिंग ही आरोपी आहे. तिचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात तिने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी साध्वी प्रज्ञासिंग ही गजाआड राहणं आवश्यक असल्याचं महाराष्ट्र सरकारने सांगितलं. हे म्हणणं ऐकून घेत सुप्रीम कोर्टाने प्रज्ञासिंगचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

close