चिदंबरम राजीनामा देणार ?

September 23, 2011 8:40 AM0 commentsViews: 5

23 सप्टेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याला आणखी एक नवं वळण मिळालं आहेत. सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार पी. चिदंबरम यांनी पंतप्रधानांना फोन करून राजीनामा द्यायची तयारी दर्शवली होती. यानंतर पंतप्रधानांनी आपण संपूर्णपणे गृहमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून चिदंबरम यांच्यावर आपला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी म्हटलंय. यासोबतच सरकारमधल्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या 2 जी संदर्भातल्या पत्रावरून वाद सुरू झाला होता. दरम्यान वीरप्पा मोईली यांनीही चिदंबरम यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

close