काळया पैशाच्या मुद्यावर न्यायाधीशांमध्येच मतभेद

September 23, 2011 10:46 AM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

काळया पैशाच्या चौकशीच्या मुद्यावर केंद्र सरकारला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्येच याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. दोन न्यायाधीशांच्या बेंचसमोर याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना हे मतभेद सुरू झालेत. काळा पैसा भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. पण या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्राने दाखल केली होती. आता दोन न्यायाधीशांमधील या वादामुळे याबाबतचा निर्णय नवीन बेंच घेणार आहे.

close