अण्णांच्या पत्राला मुख्यमंत्री आज देणार उत्तर !

September 23, 2011 8:56 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

दिल्लीत जनलोकपाल विधेयकसाठी केलेल्या लढ्यानंतर अण्णांनी राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली. सक्षम लोकायुक्त कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा केला नाही तर आपण उपोषणावर बसणार असा इशारा दिला. अण्णांच्या या इशार्‍याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेत आज त्यांचं उत्तर देणार आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. येत्या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तांचे अधिकार वाढवणारा कायदा करा अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलीय. हे पत्र आपल्याला मिळालं असून आपण आज त्याला उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close