अडवाणी सुरू करणार बिहारमधून रथयात्रा

September 23, 2011 9:18 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

लालकृष्ण अडवाणी आपली बहुचर्चित रथयात्रा गुजरातमधून नाही तर बिहारमधून सुरू करणार आहेत अशी माहिती आयबीएन-नेटवर्कला मिळाली. उपोषणानंतर मोदींना मिळालेल्या प्रसिद्धीला आणखी वाव मिळू नये यासाठी अडवाणींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. यावेळी अडवाणी गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराला भेट देण्याची आपली दोन दशकांची परंपराही मोडणार आहेत. बिहारमधून रथयात्रा सुरू करण्यामागे एनडीए (NDA) च्या मित्रपक्षांना खूश करण्याचाही अडवाणींचा हेतू आहे. 11 ऑक्टोबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. त्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार झेंडा दाखवतील अशी शक्यता आहे.

close