बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

September 23, 2011 11:14 AM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात काल बिबट्या शिरून एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोग्य केंद्रातील महिला परिचारीका ठार झाली. वैद्यकीय अधिकारी शालिनी पटले यांच्यासोबत बोलत असतांना अचानक या बिबट्याने हल्ला केला. या हल्यामुळे गावात भितीचं वातावरण पसरल्ंाय. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील गेल्या 10 दिवसातील ही दूसरी घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही गावापासून केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे केंद्र वनपरिक्षेत्रात येतं. त्यामुळे इथं वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. या बिबट्याला जेरंबद करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली. वनविभागानंही या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरु केली.

close