शोएब म्हणतो, सचिन मला घाबरायचा !

September 23, 2011 9:46 AM0 commentsViews: 1

23 सप्टेंबर

पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटर शोएब अख्तरने आपल्या आत्मचरित्रात आणखी एक नवा वाद सुरु केला आहे. सचिन आपल्या बॉलिंगला घाबरत होता असं शोएबने या चरित्रात म्हटलंय.

आणि या चरित्राचं नावंही कॉन्ट्रोव्हर्शली युवर्स असंच आहे. आपण करिअरमध्ये टॉपला होतो तेव्हा सचिनही आपल्याला बिचकून खेळत होता असा शोएबचा दावा आहे. आपण मैदानात अनेकवेळा चेंडू कुरतडल्याची कबुलीही त्यानं दिली. त्याचं हे चरित्रंही वादग्रस्त ठरणार हे नक्की. कारण ललित मोदी आणि शाहरुख खान यांना आपण आयपीएलमध्ये नको होतो. त्यांच्यामुळेच आपलं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंही त्याने चरित्रात म्हटलंय. शिवाय पाकिस्तानमधील काही सीनिअर क्रिकेटर्सवरही त्याने ताशेरे ओढलेत. जेव्हा कधी आम्ही भारतात खेळलो, त्यावेळी फिक्सर्सनी आपल्याशी संपर्क साधला असंही शोएबनं म्हटलं आहे.

close