विनोद कांबळींची क्रिकेटमधून निवृत्ती

September 23, 2011 11:21 AM0 commentsViews: 2

23 सप्टेंबर

क्रिकेटर विनोद कांबळी यांने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे. त्याच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा आज होणार आहे. यापूर्वी विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता विनोद कांबळीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रणजीमध्ये मुंबई टीमकडून खेळून 10 हजार रन्स पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न होतं. पण टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने निराश झाल्याचंही त्यानं सांगितलं.

close