शिवसेनेतर्फे हिंदीतून ‘ जाणता राजा ‘ चा प्रयोग

November 17, 2008 4:48 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर, मुंबईविनय म्हात्रेआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड वापरून उत्तर भारतीयांना जवळ करण्याचं प्रयत्न चालवल्याचं दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणून जाणता राजा या हिंदी महानाट्याचा प्रयोग मुंबईत आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुखांवरच्या विशेषांकाचंही प्रकाशन करण्यात आलं. अंधेरी इथ झालेल्या या कार्यक्रमात , दोपहर का सामनाचे संपादक प्रेम शुक्ला यांनी संपादित केलेल्या बाळासाहेबांवरच्या खास अंकाचही प्रकाशन झाल. यावेळेसच्या खासदार राऊतांच्या प्रतिक्रियेतही त्यामुळे बेरजेचं राजकारण डोकावल. ' आमचे स्तानिक मुद्दे जरूर आहेत, पण महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषिकांनी एकत्र काम केलं तर देश मजबूत होईल याचा आम्हाला विश्वास आहे ' असं ते म्हणाले.मराठीचा मुद्दा राज यांनी पळवला. आता आगामी लोकसभा निवडणुकांत उत्तर भारतीयांना दुखावण सेनेला परवडणारं नाही. मात्र विशेषांकामध्ये बाळासाहेबांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केल्याने, त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

close